Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीमुख्यमंत्र्यांची भातलावणी.. नक्की पहा...!

मुख्यमंत्र्यांची भातलावणी.. नक्की पहा…!

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. असे असले तरी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे मूळ गावातील अनेक पैलू सध्या बाहेर येत आहेत. शिंदे ज्यावेळी आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी येतात तेव्हा ते स्वस्थ बसत नाहीत. ते गावी आल्यानंतर आपल्या शेतात राबताना दिसतात.

शेती आणि शेतकरी यांच्यावर प्रेम, आपुलकी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या या शेतीच्या अभ्यासावरुन ते शेतकऱ्यांच्या हिताचे चांगले निर्णय घेतील अशी अपेक्षा अनेकांना वाटत आहे. सध्या त्यांचे सोशल मीडियावर शेतात काम करत असतानाचे फोटे व्हायरल होत आहेत. त्यांचे एक वेगळं शेतातील रुप जनतेला पाहायला मिळत आहे.

तसेच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री असतानाचा एकनाथ शिंदे यांचा शेतात भात पेरणी करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

राजकारणात एकनाथ शिंदेंची वेगळी ओळख असली तरी शेतीच्या कामाशी त्यांची नाळ कायम जोडलेली आहे. काही दिवसांपुर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वर दौऱ्यावर होते. राज्यात चांगलाच पाऊस पडल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शिंदे यांनी सुद्धा दरे गावात आपल्या शिवारात भात पेरणी करुन शेतात श्रमदान केले.

याआधी स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करतानाही एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर यावेळी शेतात भात पेरणी करताना एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते शेतात भात पेरणी करताना दिसत आहेत. सोबतीच्या मंडळींचे मार्गदर्शनाने एकनाथ शिंदे पेरणी करत आहेत. तसेच आपण व्यवस्थित करत आहोत का? असा प्रश्नही शिंदे यांनी विचारला आहे. एकनाथ शिंदेंना शेतीची कामे करण्यात प्रचंड रस आहे. त्यांना कामातून वेळ मिळेल तेव्हा गावी जाऊन शेतात काम करत असतात. एकनाथ शिंदे दरवर्षी शेतीतील काम करण्यासाठी गावी जातात. नोव्हेंबर २०२० मध्ये एकनाथ शिदे यांनी आपले मुळगाव असलेल्या दरेमध्ये कुटुंबीयांसह स्ट्रॉबेरीची लागवड केली होती.

यावेळी त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही त्यांच्यासोबत स्ट्रॉबेरी लागवडच्या कामात मदत करत होते. फोटोमध्ये एकनाथ शिंदे कुटुंबीयांसह स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करताना दिसत आहेत.

https://www.facebook.com/100004336154297/videos/1956984907789362/

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -