Tuesday, October 8, 2024
Homeदेशउदयपूर हत्याकांडातील आरोपींना नागरिकांची मारहाण

उदयपूर हत्याकांडातील आरोपींना नागरिकांची मारहाण

जयपूर यथेली एनआयए कोर्टाच्या बाहेरची घटना

जयपूर (हिं.स.) : राजस्थानच्या उदयपूर हत्याकांडातील आरोपी मोहम्मद रियाझ अख्तारी, गौस मोहम्मद त्यांचे साथीदार आसिफ आणि मोहसीन या ४ आरोपींना एनआयए कोर्टाने १० दिवसांची कोठडी सुनावली आहे. उदयपूर घटनेच्या निषेधार्थ वकिलांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. न्यायालयाच्या आवारात वकिलांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कन्हैयालालच्या निर्घृण हत्येप्रकरणी एनआयए आणि दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने आज, शनिवारी या आरोपींना कडक बंदोबस्तात जयपूरच्या एनआयए न्यायालयात हजर केले होते. न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन एटीएसच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या (एसओजी) कार्यालयात पोहोचले. एनआयएने एटीएसकडून सर्व कागदोपत्री पुरावे गोळा केले. यानंतर कन्हैयालाल हत्याकांडातील दोन मुख्य आरोपी मोहम्मद रियाज अख्तारी व गौस मोहम्मद, त्यांचे सहकारी आसिफ आणि मोहसीन या चार आरोपींना एनआयए आणि एटीएसच्या पथकाने न्यायालयात हजर केले. सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय आणि शहर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गेल्या २८ जून रोजी कन्हैयालालच्या हत्येनंतर राज्य सरकारने विशेष संशोधन पथक (एसआयटी) स्थापन करून तपास सुरू केला होता. परंतु, यानंतर प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. हत्येतील प्रमुख आरोपी रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद यांनी नूपुर शर्मा यांना पाठिंबा दिल्याबद्दल कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या केली होती. हत्येनंतर आरोपींनी इस्लामच्या अपमानाचा बदला घेतला, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -