Friday, January 17, 2025
Homeमहत्वाची बातमीलेकीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आई वडिलांनी केली आत्महत्या

लेकीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आई वडिलांनी केली आत्महत्या

सांगली : सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील राजेवाडीत ह्रदय पिळवणूक टाकणारी घटना घडली आहे. दोन वर्षीय चिमुकलीचा घशामध्ये घास अडकून मृत्यू झाला आहे. पोटच्या मुलीच्या मृत्यूची दु:ख सहन न झाल्याने नैराश्यातून मुलीच्या आई-वडिलांनी देखील आत्महत्या केली आहे. एकाच दोरीने गळफास घेऊन पती-पत्नीने आपली जीवनयात्रा संपवली. करन नाना हेगडे (वय २८) व शीतल करन हेगडे (वय २२) अशी मृतांची नावे आहेत.

हा प्रकार समजताच आटपाडी पोलीसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. यावेळी मृत करनजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. तुझा मृत्यू आम्हाला असह्य होत असल्याने आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असा मजकूर लिहिला आहे.

जेवण करीत असताना घास गळ्यात अडकल्याने दोन वर्षाच्या मुलीचा चार दिवसापुर्वी मृत्यू झाला होता. या मुलीचा मृत्यू झाल्याने माता पिता अत्यंत दु:खी झाले होते. या दोघांनी गुरूवारी दुपारी राजेवाडी गावातील काळामळा येथे असलेल्या कानिफनाथ मंदिराच्या परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -