Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीसुश्मिता सेनचे लग्न ३ वेळा मोडले.. पण का?

सुश्मिता सेनचे लग्न ३ वेळा मोडले.. पण का?

मुंबई : मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन हिने लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचे तीन वेळा ठरवले. मात्र नववधू बनायचे स्वप्न तिथेच मोडायचे, असे का होत असे, याचा मोठा खुलासा स्वत: सुश्मिता सेन हिने केला आहे.

सुश्मिता सेन आता ४६ वर्षांची आहे. तिने अद्याप लग्न केलेले नाही, परंतु आपल्या दोन दत्तक मुली रेने आणि अलिशाला घडवण्यात मात्र ती कुठेच मागे राहिलेली नाही. दोन मुली हेच तिचे आयुष्य बनले आहे. कितीतरी वेळा म्हटले जाते की या मुलींमुळेच तिने लग्न केलेले नाही. पण यावेळी याविषयावर सुश्मिता सेनने चुप्पी तोडत लग्न न करण्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री म्हणाली, ”तीन वेळा असे झालेय की जवळ-जवळ लग्नाची सगळी तयारी झाली, आता लग्न होणारंच त्यावेळी असे काही घडले की माझे नववधू बनायचे स्वप्न तिथेच मोडायचे. पण यासाठी माझ्या मुली नक्कीच कारणीभूत नाहीत”.

लग्नासंदर्भात बोलताना सुश्मिता सेन म्हणाली, ”माझे भाग्य आहे की मला माझ्या आयुष्यात काही चांगल्या मुलांना भेटायचा योग आला. पण त्यांच्याशी लग्न न करण्याचे कारण एवढंच होते की ते माझ्यासोबत मला फारसे आनंदी वाटायचे नाहीत. काही ना काही कारणाने ते निराश दिसायचे. याच्याशी माझ्या मुलींचा काहीच संबंध नव्हता. माझ्या मुली यामध्ये कधीच आली नाहीत. माझ्या दोन्ही मुलींनी माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांचा अगदी मनापासून स्विकार केला. त्यांच्या चेहऱ्यावर कधीच त्याचा ताण मला दिसला नाही. त्यांनी त्या सगळ्यांना एकसारखे प्रेम आणि सम्मान दिला. आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट होती”.

सुष्मिता सेनने स्पष्ट म्हटले आहे की, तिच्या मुली रेने सेन आणि अलिशा या तिच्या अविवाहीत राहण्याचे कारण कधीच नव्हत्या. माझ्या आयुष्यात तब्बल तीन वेळा लग्न करण्याचे प्रसंग आले पण देवाने मला वाचवले, असे मी म्हणेन.

सुश्मिता पुढे म्हणाली, ”माझे लग्न तीनदा होता होता राहिलं. तिन्ही वेळा देवानेच वाचवलं. मी त्या तीन लग्नाच्या वेळी नेमकं काय संकटं आली हे नाही सांगू शकत. पण एवढं मात्र नक्की की देवानेच माझं रक्षण केलं आणि तसंच देवानं माझ्या दोन मुलींचे देखील रक्षण करावं. मी माझ्या आयुष्यात चुकीचं काही करू नये हे देवाच्याच मनात होतं”.

सुश्मिता सेन हिने काही महिने आधी तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप केले होते. अर्थात दोघांमध्ये मैत्री अद्यापही कायम आहे. दोघे अनेकदा एकत्र सेलिब्रेशनच्या निमित्ताने दिसतातही. सुश्मिताने आपल्या ब्रेकअपची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हे नाते संपवल्याचे जाहीर केले होते. कुठेही तिने रोहमनला दोष दिले नव्हते आणि तिचे ते वागणे तिच्या चाहत्यांना खूप भावले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -