Monday, August 25, 2025

राज्यात ३२४९ कोरोना रुग्णांचे निदान, २३९९६ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात ३२४९ कोरोना रुग्णांचे निदान, २३९९६ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज ३२४९ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर चार कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. आज रोजी एकूण २३९९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज ४१८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ७८,०७,४३८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८५% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२०,४४,१२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,७९,३६३ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Comments
Add Comment