Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडी'यह तो झांकी है, मुंबई महापालिका बाकी है'

‘यह तो झांकी है, मुंबई महापालिका बाकी है’

भाजपचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई : मुंबई भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे, की यह तो झांकी है… मुंबई महापालिका अभी बाकी है! या बरोबरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रही शेअर केले आहे. यात ते आपल्या हातात बॅट घेऊन उभे असल्याचे दिसत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी राजभवनात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या गटात जल्लोष सुरु झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

तसेच भाजप महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी हे ट्विटमध्ये म्हणाले, कर्म कोणालाही सोडत नाही. या ट्विटबरोबर त्यांनी पालघर हिंसेशी संबंधित छायाचित्र शेअर केले आहे.

रवि दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हणतात, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याच्या घोषणेचा मी स्वागत करतो. त्यांना त्याच दिवशी कळले होते, की जेव्हा शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाला धोका दिल्याबद्दल बंड केले होते. त्यांच्या कार्यकाळाने सिद्ध केले की संधीसाधू आघाडी टिकत नाही.

पुढील २-४ महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीवरुन भाजप म्हणते, की ही तर केवळ झांकी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका जगातील सर्वात श्रीमंत आणि मोठी महानगरपालिका आहे. तिला शिवसेनेची सोन्याची अंडी देणारी कोंबडी मानली जाते. महापालिकेने यंदा २०२२-२३ साठी ४५ हजार ९४०.७८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यावरुन महापालिकेची ताकद दिसून येते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -