Saturday, June 14, 2025

देशात १८,८१९ नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णसंख्या एक लाखाच्या पुढे

देशात १८,८१९ नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णसंख्या एक लाखाच्या पुढे

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचा आलेख वाढतानाच दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढून एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे. ही चिंताजनक बाब आहे. देशात गेल्या २४ तासांत १८ हजार ८१९ नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात ३९ रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या १ लाख ४ हजार ५५५ सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत.


कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. आदल्या दिवशी कोरोनाचे १४ हजार ५०६ नवीन रुग्ण आढळले होते. यादरम्यान कोरोनाची लागण झालेल्या ३० जणांचा मृत्यू झाला होता.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ८२७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ लाख २५ हजार ११६ वर पोहोचली आहे.

Comments
Add Comment