Tuesday, July 23, 2024
Homeमहामुंबईपालिका शाळांतील विद्यार्थी अद्याप रेनकोटविनाच

पालिका शाळांतील विद्यार्थी अद्याप रेनकोटविनाच

मुंबई (प्रतिनिधी) : जून महिना संपायला आला तरी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्यापही रेनकोट आणि बूट मिळालेले नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होऊन दहा दिवस उलटूनही विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावे लागत आहे. कंत्राटदाराला अद्यापही वर्क ऑर्डर न मिळल्यामुळे विद्यार्थ्यांना हाल सोसावे लागत आहेत.

दरम्यान मुंबईत पालिकेच्या ९ माध्यमांच्या ९६३ शाळा असून त्यात २० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील २४३ शाळा प्राथमिक आहेत. या विद्यार्थ्यांना पालिकेकडून दरवर्षी २७ वस्तूंचे वाटप केले जाते. यात पावसाळ्यासाठी रेनकोट, बूट देखील असतात. सध्या पालिकेने शालेय वस्तूंचे वाटप विद्यार्थींना सुरू केले असले तरी रेनकोट आणि बूटचे वाटप झालेले नाही.

या साठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात यंदा उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यासाठीचे बूट आणि रेनकोट मिळाले नाही. उशिरा निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर कंत्राटदाराला अद्यापही वर्क ऑर्डरच देण्यात आलेली नाही. याबाबत सह आयुक्तांकडे नुकतीच एक बैठक झाली होती. या बैठकीत कंत्राटदाराने इतक्या लवकर साहित्य उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे सांगत ४५ दिवसांचा अवधी मागितला आहे. मात्र लवकरात लवकर साहित्य उपलब्ध करून देण्याचा सूचना अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला केल्याचे समजते.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालिका प्रशासनाचा उदासीन दृष्टिकोन आहे. केवळ काही लाभार्थ्यांना फायदा पोचवण्यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई केली जाते.  – प्रभाकर शिंदे, माजी गटनेते, भाजप

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -