Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीशेनाज ट्रीजरीला फेस ब्लाइंडनेसचा गंभीर आजार

शेनाज ट्रीजरीला फेस ब्लाइंडनेसचा गंभीर आजार

‘इश्क विश्क’ चित्रपटातून केले होते पदार्पण

मुंबई : अभिनेत्री शेनाज ट्रीजरीने सोशल मीडियाद्वारे आपण प्रोसोपेग्नोसिया नावाच्या गंभीर आजाराला तोंड देत असल्याची माहिती दिली आहे. या आजाराला फेस ब्लाइंडनेस देखील म्हटले जाते. या आजारामुळे अनेक लोकांचे चेहरे ओळखण्यास समस्या येत असल्याचे तिने सांगितले आहे.

प्रोसोपेग्नोसिया नावाच्या आजाराचे निदान झाले आहे. अनेक चेहरे का आठवत नव्हते हे आता मला समजू लागले आहे. पूर्वी मी मुर्ख असल्याचे वाटायचे. परंतु मी मूर्ख नव्हे तर आजारी आहे. मी केवळ लोकांच्या आवाजाद्वारे त्यांना ओळखू शकते. हा आजार झालेला व्यक्ती स्वतःचे मित्र तसेच कुटुंबीयांचे चेहरे देखील ओळखू शकत नसल्याचे शेनाजने सांगितले.

लोकांना ओळख न दाखविण्याचे कृत्य मी करत नव्हते, तर आजारामुळे हा प्रकार घडत होता, हे कृपया लोकांनी लक्षात घ्यावे. चेहरे ओळखता येत नसल्याने नेहमी माझीच मला लाज वाटायची असे तिने म्हटले आहे.

शेनाज सध्या एक ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून काम करत आहे. मुंबईत जन्मलेल्या शेनाजला लिखाणाची आवड आहे. तिने अनेक ब्रँडसाठी ट्रॅव्हल आर्टिकल्स लिहिले आहेत. याचबरोबर अनेक ट्रॅव्हल शोंचे सूत्रसंचालन केले आहे.

२०११ मध्ये प्रदर्शित ‘लव्ह का द एंड़’ या चित्रपटाची पटकथा तिने लिहिली होती. ‘डेल्ही-बेली’, ‘मैं और मिस्टर राइट’, ‘हम-तुम’, ‘उम्र’, ‘आगे से राइट’, ‘रेडिओ’, ‘वन लाइफ टू लिव्ह’ समवेत अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -