Saturday, October 25, 2025
Happy Diwali

“काही किती हुशार…” निलेश राणे यांची सुप्रिया सुळे यांना खोचक प्रतिक्रिया

“काही किती हुशार…” निलेश राणे यांची सुप्रिया सुळे यांना खोचक प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ ५० आमदार असल्याने त्यांचे १४५ चे बहुमत कसे होणार अशी उपरोधिका टिका राष्ट्रवादी पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती या टिकेला भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी “काही ती हुशार, अशी खोचक प्रतिकिया दिली आहे.

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध भाजपा आणि बंडखोर शिवसेना आमदार अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

२१ जून रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काही सहकाऱ्यांसोबत बंडखोरी करुन सूरतला गेल्यापासून सुरु झालेल्या या सत्तासंघर्षादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी बैठकींचा सापटा लावला आहे. अशाच एका बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरुन निलेश राणे यांनी कमी शब्दात खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली.

Comments
Add Comment