Saturday, March 22, 2025
Homeमहामुंबईप्रेम प्रकरणातून वाद, माय-लेकींची हत्या करत स्वतः केली आत्महत्या

प्रेम प्रकरणातून वाद, माय-लेकींची हत्या करत स्वतः केली आत्महत्या

मुंबई (हिं.स.) : पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात एका चालकाने आपली मालकीण आणि तिच्या दोन मुलींची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावे आहेत. चालक शिवदयाल सेन याने तिघींचा गळा दाबून खून केला.

अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कुटुंबातील आई आणि दोन मुलींची त्यांच्याच चालकाने हत्या केली. खून करण्यासाठी चालकाने धारदार शस्त्राचा वापर केला. यानंतर चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चालक आणि मृतांमधील धाकटी मुलगी यांच्यात प्रेमाचे संबंध होते. यावरून आई, मुलगी आणि चालकामध्ये वाद झाला. यानंतर चालकाने पहिल्यांदा आईची हत्या केली, मग दोन्ही बहिणींचा खून करून स्वत:चे देखील आयुष्य संपवले.

कांदिवली परिसरातील देना बँक जंक्शन येथे ही घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात शोध घेतला. तेव्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोन महिलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसराची झडती घेण्यात आली. पहिल्या मजल्यावरही शोध घेतला असता तेथे दोन व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळल्या.

अधिक तपासात पोलिसांना चालक शिवदयाल सेन याच्या कपड्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. ज्यात त्याने लिहिले आहे की, माझे भूमीवर प्रेम आहे. परंतु आमचे संबंध मान्य नसल्यामुळे मी तिघींचा खून करून स्वत:चे आयुष्य संपवले. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवले आहे. कांदिवली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -