मुंबई : केजीएफ या सुपरडुपर हिट झालेल्या चित्रपटातील अभिनेते बी. एस. अविनाश याचा आज सकाळच्या सुमारास बंगळुरूमध्ये अपघात झाला. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
कुंबळे सर्कलजवळ त्याच्या गाडीची आणि एका ट्रकची टक्कर झाली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. तसेच कुर्बन पार्क पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
केजीएफ चित्रपटात अविनाश याने अॅड्र्यूची भूमिका साकारली होती. स्थानिक गुंडाच्या मालकाची त्याची भूमिका फार गाजली होती. लवकरच केजीएफचा तिसरा भाग सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.