Monday, July 15, 2024
Homeदेशफडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावे; नड्डा

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावे; नड्डा

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात एकापाठोपाठ घडामोडी घडत असून सर्वांचेच अंदाज चुकत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचे सांगून काही वेळ जात नाही तोच त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सूचित केले आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या सर्वामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपण सहभागी होणार नाही असे फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, आता फडणवीस राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.

नड्डा म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी अशी इच्छा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आहे. त्यानुसार आता फडणवीस राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्याचा आग्रह केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे फडणवीसांनी मोठे मन दाखवत मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगत आपण बाहेर राहून सरकारला साथ देणार असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्रातील जनतेचा विकास व्हावा आणि कल्याण व्हावे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय पथकाने घेतला आहे. सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदचा पदभार स्वीकारावा असे म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असे निर्देश केंद्राने दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -