Friday, October 17, 2025
Happy Diwali

मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदे यांचे पहिले ट्वीट

मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदे यांचे पहिले ट्वीट

मुंबई : मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिले ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी ट्वीट केले की, हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…असल्याचे म्हटले आहे.

शिंदे म्हणाले की, "आमदारांचे संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो’ असे एकनाथ शिंदे म्हणाले.

https://twitter.com/mieknathshinde/status/1542483786059116549

बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. शिवसेना पक्ष म्हणून कायदेशीर प्रक्रीया करून शिवसेनेचे तसेच अपक्ष आमदार मिळून आम्ही गेले काही दिवस एकत्र आहोत.

Comments
Add Comment