Wednesday, January 14, 2026

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

मुंबई : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे ३० वे मुख्यमंत्री बनले आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आतच एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

आज राजभवनमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >