 
                            मुंबई : राज्यपालांनी गुरुवारी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदार उद्या मुंबईमध्ये पोहोचणार आहे. त्यांचा सुरक्षेसाठी केंद्र सरकारने दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत.
बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना ठिकठिकाणी आक्रमक झाल्याची दिसत असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार हे गुवाहाटीवरुन आज गोव्याला पोहोचणार आहेत. त्यानंतर उद्या हे सर्व आमदार मुंबईत पोहोचणार आहेत. सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची तूकडी मुंबईत दाखल झाली आहे.
शिवसैनिकांनी अनेक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांना विमानतळापासून ते विधानसभेपर्यंत नेण्याची जबाबदारी ही जवानांवर आहे. तसेच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीसा बजावल्या असून कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य करुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये असा आदेश दिला आहे.

 
     
    




