Friday, July 11, 2025

नवीन जिंदाल यांना हत्येची धमकी

नवीन जिंदाल यांना हत्येची धमकी

नवी दिल्ली : भाजपचे निलंबित नेते नवीन कुमार जिंदाल यांना ई-मेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. जिंदाल यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.


राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैय्यालाल नामक व्यावसायिकाची मंगळवारी मान कापून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यामुळे देशभर भीतीचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे निलंबित नेते नवीन कुमार जिंदाल यांना कन्हैय्या प्रमाणे ठार मारण्यात येईल अशी धमकी ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आलीय. भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर प्रेषीत मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भात कथित आक्षेपार्ह टिप्पण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर शर्मा आणि जिंदाल यांना भाजपातून निलंबित करण्यात आले.


नुपूर शर्माच्या समर्थनात सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केल्यावरून राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैय्यालाल नामक व्यापाऱ्याची हत्या करण्यात आलीय या हत्येनंतर आज, बुधवारी सकाळी 7.45 वाजता नवीन कुमार जिंदाल यांच्या ई-मेल वर धकमीचे मेल पाठवण्यात आले. या ई-मेल सोबत कन्हैय्यालालच्या हत्येचे व्हिडीओ संलग्नीत करून नवीन कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देण्यात आलीय. यासंदर्भात नवीनकुमार यांनी ट्वीट करत माहिती दिलीय. तसेच पूर्व दिल्लीचे डीसीपी, पोलिसांचे स्पेशल सेल आणि पोलिस आयुक्तांना ट्विट करत दखल घेण्याची विनंती केली आहे.

Comments
Add Comment