
मुंबई : "सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेलं, मंत्री गेले, आमदार गेले..." असे म्हणत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेलं, मंत्री गेले, आमदार गेले... लोकशाहीत बहुमत असावं लागतं जे आज नाही. आता तरी मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडून राजीनामा देत लोकभावनांचा आदर राखायला हवा" असे केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/keshavupadhye/status/1542000265284694016
"गेले एक आठवडा रोज संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही विधानभवनात सिद्ध करू. आता राज्यपालांनी सांगितलं सिद्ध करा तर बहुमत चाचणी नको म्हणून कोर्टात गेली ही मंडळी" असे देखील केशव उपाध्ये यांनी आणखी एक ट्विट केले आहे.
https://twitter.com/keshavupadhye/status/1542018037485686784
उद्याच विधानसभेत बहुमत चाचणी घेण्यासाठी राज्यपालांनी उद्या विशेष अधिवेशन बोलवण्याचे पत्र राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे. उद्या सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्यावी लागणार आहे. याच दरम्यान ठाकरे सरकारने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने भाजपाने ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.