मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात सध्याच्या घडामोडींचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी राज्यातील राजकीय स्थितीबाबतही भाष्य केले आहे.
राज्यपालांनी या पत्रात बहुमत चाचणीसाठीच्या निर्देशांसाठी अनेक छोट्या बाबींवर लक्ष दिले आहे. सभागृहात बहुमत चाचणी दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठीदेखील खबरदारी घेण्यास राज्यपालांनी सांगितले आहे.
२८ जून २०२२ रोजी ७ अपक्ष आमदारांनी राजभवनाला ई-मेल पाठवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बहुमत नसल्यानं लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची मागणी ई-मेलद्वारे केली आहे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी २८ जून २०२२ रोजी माझी भेट घेतली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती समजावून सांगत मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावल्याचा दावा त्यांच्याकडूनही करण्यात आला.
घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची विनंती विरोधी पक्षनेत्यांनीही केली
शिवनसेनेतील ३९ आमदारांच्या घरावर आणि कार्यालयावर होणारे हल्ले पाहता त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. माध्यमांतील बातम्या पाहता, मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करणं अपरिहार्य असून त्यासाठी बहुमत चाचणी घेण्यात यावी
राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून सरकारकडे बहुमत आणि सभागृहाचा विश्वास असल्याची खातरजमा करणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी ३० जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवलं आहे
विधीमंडळाच्या सचिवांनी बहुमत चाचणीसाठी ३० जून २०२२ रोजी विशेष अधिवेशन बोलवण्याची सूचना मी या पत्राद्वारे देत आहे.
मी खालील आदेश देत आहे…
३० जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं आणि बहुमत चाचणीची प्रक्रिया संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावी.
काही नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य पाहता विधानभवनात आणि विधानभवनाबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात यावी, जेणेकरून बहुमत चाचणीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल.
सभागृहाच्या कामकाजाचं लाईव्ह प्रेक्षपण करण्यात यावं.
आमदारांना त्यांच्या जागेवर उभं राहून शिरगणतीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडावी.
कोणत्याही कारणास्तव बहुमत चाचणीची प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही.
बहुमत चाचणीच्या प्रक्रियेचं व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावं आणि त्याचा अहवाल माझ्याकडे सोपवण्यात यावा.
– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल