Friday, November 14, 2025

राज्यात ३९५७ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण २५७३५ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात ३९५७ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण २५७३५ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज ३९५७ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून ७ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज रोजी एकूण २५७३५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज ३६९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ७७,९८,८१७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८२% एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१९,५९,२८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,७२,४७४ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा