गुवाहाटी : एकनाथ शिंदेंसह अनेक शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्याने सध्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. एकापाठोपाठ एक सेनेचे मंत्री शिंदे गटात सामिल होताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे, राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे देखील गुवाहटीत शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यानंतर उदय सामंत यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत यांचा एक व्हिडीओ एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. “मला एक संभ्रम दूर करायचा आहे. मी शिवसेनेतच आहे. पण बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आमच्या घटक पक्षांमुळे वाईट नजर लागली आहे. त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांचे समर्थन करण्यासाठी मी गुवाहाटीला आलो आहे. मला पदाधिकाऱ्याना आवाहन करायचे आहे की कोणाच्याही गैरसमजांना बळी पडू नका. मी शिवसेनेत आहे. बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना टिकली पाहिजे,” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे.@samant_uday #MiShivsainik pic.twitter.com/hXgmTMibEB
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022