राऊतांना ईडीचे दुसरे समन्स, १ जुलैला होणार चौकशी

मुंबई : संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. मात्र, राऊत यांनी ईडीसमोर चौकशीला हजेरी लावली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा राऊत यांना ईडीने दुसरे समन्स बजावत १ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.


पत्राचाळ जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले. संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, संजय राऊत यांनी अलिबाग मेळावा आणि अन्य काही कारणास्तव चौकशीला हजर राहणार नसल्याचे सांगितले होते. तसेच उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मिळावी, अशी विनंती केली होती. संजय राऊत यांच्यावतीने त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर झाले.


नवीन समन्सनुसार संजय राऊत यांना चौकशीसाठी १ जुलै रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी विचारलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी, असेही ईडीने म्हटले आहे.

Comments
Add Comment

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि