Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाइंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

लंडन (वृत्तसंस्था) : इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार म्हणजे इयॉन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन याच्या निवृत्तीची माहिती आयसीसीने ट्वीट करत दिली आहे.

क्रिकेट जिथे सर्वात आधी सुरु झाले अशा इंग्लंडला क्रिकेट विश्वचषक सुरू होऊनही कित्येक वर्षे विश्वचषक जिंकता आला नव्हता. पण ही अद्भूत कामगिरी करून दाखवली इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने २०१९ साली. न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात मात देत इंग्लंडने हा विश्वचषक जिंकला होता. पण मॉर्गन लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता त्याने निवृत्ती जाहीर केल्याची अधिकृत माहिती आयसीसीने दिली आहे.

३५ वर्षीय मॉर्गन मर्यादीत षटकांतील उत्तम कर्णधार असण्यासह इंग्लंडकडून धावा करण्यातही आघाडीवर होता. त्याने इंग्लंडकडून २२५ एकदिवसीय सामन्यांत १३ शतकांसह ६ हजार ९५७ धावा ठोकल्या. तर आयर्लंड आणि इंग्लंडकडून मिळून ७ हजार ७०१ धावा १४ शतकांसह केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने १२६ सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्व करत ७६ सामने संघाला जिंकवून दिले.

मॉर्गन एक अत्यंत यशस्वी टी२० खेळाडू देखील आहे. त्याने ७२ पैकी ४२ सामन्यांत संघाचा कर्णधार राहून विजय मिळवून दिला. तर ११५ टी२० सामन्यांत १३६.१८ च्या सरासरीने २ हजार ४५८ धावा केल्या. यावेळी १४ अर्धशतकंही त्याने ठोकली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -