मुंबई : अरबी समुद्रात ऑईल रिगजवळ ओएनजीसी हेलिकॉप्टरचे इमरर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये ९ प्रवासी होते ज्यापैकी ४ प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले असून, इतर प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग नेमके का करण्यात आले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये ओएनजीसीचे सहा कर्मचारी आणि कंपनीसाठी काम करणाऱ्या कंत्राटदाराचा एक कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ओएनजीसीकडे अरबी समुद्रात अनेक रिग आहेत ज्यांचा वापर समुद्रतळाच्या खाली असलेल्या जलाशयांमधून तेल आणि वायू तयार करण्यासाठी केला जातो.