मुंबई : कळवा स्थानकाजवळच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक पहाटे विस्कळीत झाली होती. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या. कल्याण आणि सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल अद्यापही साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत.
दरम्यान मध्य रेल्वेवर वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे.