Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

७२३१ पोलिस पदांसाठी होणार भरती

७२३१ पोलिस पदांसाठी होणार भरती

मुंबई : महाराष्ट्रात पोलिसांच्या ७ हजार २३१ पदांसाठी भरती होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी याला मंजुरी देण्यात आली. या भरतीसाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही पोलीस भरती दोन टप्प्यामध्ये करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पाच हजार पोलीस भरती ही पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील सात हजार २३१ पदांसाठीची ही भरती आता करण्यात येणार आहे.


काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या संबंधी प्रक्रिया त्वरीत सुरू करण्यात येणार आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता या भरतीसाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकर भरतीची प्रक्रिया लांबली होती.


कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेलाही बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या प्रक्रियेमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment