मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात काल रात्री ११.३० च्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या घटनेत ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ढिगाऱ्याखाली २० ते २५ लोक अडकले असण्याची शक्यता आहे, आतापर्यंत ६ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1541521010314227712महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून ५ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. असे असतानाही त्यात ८ ते १० कुटुंबे राहत होती, सर्व भाडेकरू आहेत, आदित्य ठाकरेंनी लोकांना आवाहन केले आहे की, जेव्हा जेव्हा महापालिका नोटीस देईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये.






