Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीशिंदे गटातील २० आमदार शिवसेनेच्या संपर्कात

शिंदे गटातील २० आमदार शिवसेनेच्या संपर्कात

अनिल देसाईंचा खळबळजनक दावा

मुंबई : गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले २० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते अनिल देसाई यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेचे तब्बल ४० आमदार असले तरी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केवळ ३८ आमदारांचा उल्लेखच करण्यात आला होता. त्यामुळे हॉटेलमध्ये असलेले दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. सर्व आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निलंबनाची कारवाई मागे घेतलेली नाही. याचा फैसला आता ११ जुलैला होणार आहे.

यावर देसाईंनी सांगितले आहे की, कोणत्याही गोष्टी करायचा प्रयत्न झाल्यास मज्जाव करण्यात येईल. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. याच्या जोडीला गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले २० आमदार आमच्या नेतृत्त्वासोबत संपर्कात आहेत. त्यांचं म्हणणं ठाम आहे की, आम्ही मुंबईत किंवा विधानसभेत मतदानाला आल्यास शिवसेनेचे समर्थन करू. त्यामुळे देसाई यांचा हा दावा खरा ठरल्यास एकनाथ शिंदे यांचे बंड पूर्णपणे फसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर हा धोका टाळण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांना रसद पुरवणाऱ्या ‘महाशक्ती’कडून काय पावले उचलली जातात, हे पाहावे लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -