Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या गटाचे नाव ‘शिल्लक सेना’ करावे

उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या गटाचे नाव ‘शिल्लक सेना’ करावे

मुंबई (प्रतिनिधी) : आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वतःच्या गटाचे नाव ‘शिवसेना’ ऐवजी ‘शिल्लक सेना’ करून घ्यावे, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला.

निलेश राणे यांनी आणखी एक ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, रोड टेस्टची वार्ता करू नका, बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल. संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असे म्हटले होते. त्यावर निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांनी बंड केल्याने राज्य सरकार धोक्यात आले आहे. महाराष्ट्रातील झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडी आणि राजकीय संकट सातत्याने धक्कादायक आणि लक्षवेधी वळणे घेत आहेत. आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून काहीच दिवस झाले असून राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >