
मुंबई : संजय राऊत यांना जमीन घोटाळ्यात संबंधित समन्स बजावण्यात आले असून, उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे बंडखोर आमदारांमुळे अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांना ईडीचे समन्स येताच भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी ट्वीट करत राऊतांवर टीका केली आहे. 'तुम्ही माझ्या कुटुंबियांना जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा, परंतु तुम्हाला हिशोब तर द्यावाच लागणार,' असे सोमय्या म्हणाले आहेत.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1541324205547208704