Thursday, July 10, 2025

निवृत्त पोलिसांना घरं रिकामी करण्याचे निर्देश

निवृत्त पोलिसांना घरं रिकामी करण्याचे निर्देश

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळीतील निवृत्त पोलिसांच्या कायम स्वरुपी घराबाबत राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे. त्यानुसार संबंधित चाळीतील निवृत्त पोलिसांना येथे ५० लाखांऐवजी २५ लाख रुपयांत घरं देण्यात येणार असल्याचे आव्हाडांनी नमुद केले आहे.


https://twitter.com/Awhadspeaks/status/1541305791952457728

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि माझे नेते शरद पवारसाहेब ह्यांच्या सल्ल्यानुसार बीडीडी चाळी तील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी घर नावावर करून देण्यात आले. आता ती घर ५० लाख ऐवजी २५ लाख रुपयात देण्यात येतील. आता घर रिकामी करा आणि प्रकल्प पुढे जाऊद्यात. #24तास_जनतेसाठी असे आव्हाडांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment