Friday, January 16, 2026

घरात घुसून बिबट्याचा महिलेवर हल्ला

घरात घुसून बिबट्याचा महिलेवर हल्ला

रत्नागिरी (हिं.स.) : बिबट्याने घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यात वाशी सहाणेची येथे घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी महिलेला बाहेर काढल्याने बिबट्या घरातच अडकला. या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांना ग्रामस्थांनी सहकार्य केले. संगमेश्वरनजीकच्या वाशी सहाणेची येथे सोमवारी सकाळी बिबट्याने थेट घरात शिरत महिलेवर हल्ला केला. जखमी महिलेला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. मात्र आता वन्यप्राण्यांकडून नागरिकांवर भेट हल्ले होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा