Wednesday, July 24, 2024
Homeमहामुंबईपदवी प्रवेशासाठी इन हाऊस कोट्यात २५ टक्क्यांनी घट

पदवी प्रवेशासाठी इन हाऊस कोट्यात २५ टक्क्यांनी घट

मुंबई (प्रतिनिधी) : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची विद्यापीठात ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. या कालावधीत इन हाऊस प्रवेश देण्यात यावेत, असे विद्यापीठाने जाहीर केले होते. ही प्रक्रिया संपत आली असली, तरी दर वर्षीच्या तुलनेत यंदा इन हाऊस कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५ टक्क्यांनी घट झाली आहे.

याबाबत काही प्राचार्यांनी सांगितले की, बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठीचे कॉलेजांच्या अंतर्गत (इन हाऊस) कोट्यातील प्रवेश यंदा संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. अलीकडे बारावीनंतर विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमांना अधिक पसंती असल्याने कॉलेजांच्या अंतर्गत कोट्यातील प्रवेशप्रक्रिया यंदा संथगतीने होत आहे. प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी धडपड करत असत. पण आता विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमाला पसंती आहे.

इन हाऊस कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आता “सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम”ची मागणी जास्त आहे. या प्रकारच्या कोर्सेसमध्ये कमी कालावधीत शिक्षण लवकर पूर्ण होते आणि रोजगाराची संधी असते. त्या शिवाय हल्ली मुक्त शिक्षण विद्यापीठाचा जास्त ट्रेंड सुरू आहे. यात कॉलेजमध्ये न जाता बाहेरून आपले शिक्षण पूर्ण करता येते आणि विद्यार्थ्यांना आपली नोकरीही सुरू ठेवता येते. अद्याप यंदा सीबीएसई आणि आयएससी बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे यावर्षी ही प्रवेश प्रक्रिया प्रथम राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची होणार आहे. पण सीबीएसई आणि आयएससी बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यासाठी इन हाउस कोटामध्ये प्रवेश निश्चित केला जात असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -