नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात १७ हजार ७३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ५ लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात ९४ हजारांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत.
गेल्या 24 तासांत देशात 15 हजार 208 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.57 टक्क्यांवर पोहोचले आहे. यासह आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 27 लाख 87 हजार 606 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आठवड्यातील रुग्णांचा सकारात्मकता दर 3.39 टक्के आहे. कोरोना साथरोग सुरु झाल्यास आतापर्यंत भारतात 5 लाख 25 हजार 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशव्यापी लसीकरणात रविवारी दिवसभरात 2 लाख 49 हजार 646 कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशात एकूण 197 कोटी 11 लाख 91 हजार 329 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…