
मुंबई : महाविकास आघाडीला एकामागोमाग एक धक्के बसत असून मंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार गुवाहटीत एकनाथ शिंदे गटात सामील झालेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक पोस्ट करत नाव न घेता शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी वाघ आणि मांजरीचा एडिट केलेला एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच हा फोटो शेअर करताना त्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरळीवरून टोला लगावला.
https://twitter.com/NiteshNRane/status/1540766808864862208
नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “विमानतळ ते विधानभवनाचा रस्ता वरळीतूनच जातो. माझं ‘मॅव मॅव’ ऐकून थांबा बररर का!”