Wednesday, October 9, 2024
Homeमहत्वाची बातमीसिंहगडवर कोसळलेल्या दरडीखाली ट्रेकरचा मृत्यू

सिंहगडवर कोसळलेल्या दरडीखाली ट्रेकरचा मृत्यू

पुणे (हिं.स.) : सिंहगडाच्या कल्याण दरवाजा जवळ तटबंदीच्या खालच्या भागातील कल्याण गावाकडे जाणाऱ्या पायवाटेवर कोसळलेल्या दरडीखाली सापडलेल्या एका ट्रेकरचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे सदस्य तानाजी भोसले आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह दरडीखालून रात्री साडेअकरा वाजता बाहेर काढला. सायंकाळी पाच वाजता तो बेपत्ता असल्याची वार्ता सिंहगड परीसरात पसरली होती.

हेमांग धीरज गाला (वय ३१, रा. ७९३, श्रीमान सोसायटी, भांडारकर रोड, पुणे) असे त्याचे नाव आहे. तो राज्यस्तरीय फुटबॉलपट्टू आणि पट्टीचा ट्रॅकर होता. काल पश्चिम घाट रनिंग फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सिंहगड परिसरात एपिक ट्रेल मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातून ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. हेमांग २२ किलोमीटरच्या स्पर्धेत सहभागी झाला होता. सिंहगड पायथ्याच्या आतकरवाडी येथून या स्पर्धेला सुरुवात झाली होती.

आतकर वाडीतून कोंढणपूर मार्गे कल्याण दरवाजातून गडावर येऊन पुन्हा आतकरवाडी असा या स्पर्धेचा मार्ग ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी स्वयंसेवकही मार्ग दाखवण्यासाठी होते. कल्याण दरवाजातही असलेल्या स्वयंसेवकांनी दरड पडल्याचा आवाज आल्याचे त्यांनी सांगितले. तिथे कोणताही ट्रेकर, पर्यटक किंवा स्थानिक ग्रामस्थ नसल्याचे त्यांनी खात्री केल्याचेही कळवण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -