Categories: कोलाज

जबाबदारी पालकांची…मुलांच्या सुरक्षिततेची!

Share

अनेकदा शाळा सुटल्यानंतर पालक दिसले नाहीत, तर मुले भांबावतात आणि मिळेल तो रस्ता पकडतात, यासाठी पालकांनी सतर्क राहणं आवश्यक ठरतं…

प्रियानी पाटील

शाळेच्या गेटमधून भरभर येणारी मुलं पाहून क्षणभर काळजाचा ठोका चुकलाच. अनेक मुलांच्या गर्दीत आपलं मूल कधी दिसेल यासाठी डोळे आतुर झाले. पण एवढ्या गर्दीत मान उंच करूनही मूल दृष्टीस पडत नाही म्हटल्यावर काळीज चरकलेच. पण नंतर आपलं मूल आपसूकच समोर आल्यावर जीवात जीव आला. मुलांच्या या अशा गर्दीत खरंच आपलं मूल केव्हा अगदी गेटच्या बाहेर येतं आणि आणि कधी आपल्यासमवेत घेतो, असं होऊन गेलेलं असतं. मुलाच्या काळजीबरोबरच त्याची सुरक्षितताही यावेळी मनात दाटून राहिलेली असते नकळत. आपलं मूल बाहेरच्या जगात वावरताना ते कसं सुरक्षित राहील, यासाठी प्रत्येक आई किती काळजी घेत असते.

शाळेमध्ये त्याला सोडण्यापासून त्याला घरी आणेपर्यंत तिच्या जीवात जीव नसतो. आपल्या मुलासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार असतो. त्याचे शब्द झेलण्यापासून अगदी म्हणेल ते. पण सुरक्षिततेच्या दृष्टीने आपणच काही नियम बनवले, तर ते सोयीस्कर ठरू शकतात. अनेकदा मुलांना मित्रांसोबत घरी यायचे असते, अनेकदा मुलांना प्रायव्हेट गाडीने स्कूलला जायचे यायचे असते, अनेक मुलांना चालत, तर अनेकांना रिक्षा, बस असे अनेक प्रकार दिसून येतात. खाण्या-पिण्यातही मुलांचा अनेकदा हट्ट दिसून येतो. मुलांचे हट्ट आणि वास्तवता यातील फरक ओळखून त्याला तो पटवून दिला, तर लहान वयातच मूल समंजस बनतं.

प्रायव्हेट गाडीने येणारं आपलं मूल वेळेवर घरी येतं का? ते मूल त्या गाडीत नीट बसतं का? त्याला कोणत्या त्रासाला, तर सामोरं जावं लागत नाही ना, मुलाची कोणती गैरसोय तर होत नाही ना, याची काळजी प्रत्येक पालकांनी घेणे गरजेचे आहे. केवळ शाळा सुरू झाली, मुलाच्या प्रवासाची सोय केली, इतकेच पुरेसे नाही. मुलाची मानसिक स्थितीही समजून घेणे आवश्यक आहे.

जेव्हा प्रत्येक पालक स्वत: ही जबाबदारी स्वीकारून मुलाला स्वत: ने-आण करायला जाताे, तेव्हा मिनीट आणि सेकंद महत्त्वाचा असतो. शाळेची वेळ प्रत्येक मुलासोबत पालकांनीही पाळणं गरजेचं असतं. आपलं मूल वेळेवर स्कूलमध्ये जाऊन ते स्कूल सुटायच्या वेळेतच पालकांनी स्कूलच्या गेटवर हजर राहण्याची जबाबदारी त्यांची असते. कारण स्कूल सुटल्यावर मूल गेटच्या बाहेर आल्यावर जर पालक बाहेर नसतील, तर त्या मुलाचीही घालमेल होते. कुठे जावं? पालक आलेच नाहीत, तर आपणच जावं का घरी? की पुन्हा पालक आले, तर चुकामूक होईल, असे अनेक प्रश्न त्यालाही पडतात. कुणासोबत जावं का? की, आपले आपणच जावे? पालकांची वाट पाहत इथेच थांबावे का? असे एक ना अनेक प्रश्न पडतात. अशा वेळी आपणच वेळ पाळली, तर मुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ती सोयीस्कर ठरू शकते.

अनेकदा प्रायव्हेट गाड्या असतात. व्हॅन लावल्या जातात. आपलं मुल वेळेवर येईल घरी या भ्रमात अनेक पालक असतात. पण दक्षता म्हणून सुरुवातीला आपलं मूल नीट घरी येतेय ना, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मूल… आईच्या काळजाचा तुकडाच. आपलं मूल जरा नजरेआड झालं की, जीव केवढा कासावीस होतो. मुलाच्या शाळेचा पहिला दिवस जरा रूखरूख वाढवणाराच असतो प्रत्येक पालकांसाठी. इतके दिवस सुट्टीत घरी असणारं मूल जेव्हा शाळेत जातं, तेव्हा तो पहिला दिवस प्रत्येक आईसाठी काहीसा सुनासुनाच वाटून जातो.

या रोजच्या प्रवासात प्रत्येेक पालकासाठी महत्त्वपूर्ण ठरते ती गोष्ट म्हणजे मुलाची सुरक्षितताच. अापलं मूल सुरक्षितपणे घरी कसं येईल, त्याला कोणता त्रास, तर होणार नाही ना? आपण डोळे बंद करून मूल शाळेतून नीट घरी येईल, या भरवशावर राहण्यापेक्षा तो सुखरूप घरी येईल याची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक पालक विशेषत: माता आपल्या मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जात असतील, तर आपलं मूल शाळेच्या गेटमधून बाहेर येईपर्यंत त्याला घरी आणेपर्यंत ती जबाबदारी त्या मातेची राहते. आपलं मूल सुरक्षित कसं राहील? यासाठी तिचे हरप्रकारे प्रयत्न असतात. पण एखादी नजरचूक तिच्यासाठी घातक ठरू शकते. आपलं मूल शाळेत सोडताना तुम्ही कोणावर जबाबदारी सोपवली आहे, ती व्यक्ती ती जबाबदारी नीट पार पाडते आहे का? आपलं मूल सुरक्षितपणे, सुखरूपपणे घरी येते का? हे प्रत्येक पालकाने पाहणे आवश्यक असते.

आपलं मूल कोणा अनोळखी माणसासोबत जाण्याआधी आपण त्याची जबाबदारी घेणे आवश्यक असते. अभ्यासाच्या होऱ्यात मूल खेळातही गुरफटलेलं असतं. अभ्यासाबरोबरच मुलांना खेळातही प्रावीण्य देणं ही पालकांची मानसिकता पाहता, अनेक पालक केवळ अभ्यास आणि अभ्यासावर भर देताना मुलाच्या मानसिकतेचा विचार करत नाहीत. मुलाच्या टिफिनचा विचार करताना अनेकदा आईला रोज काय बनवायचे? हा प्रश्न पडतो, तेव्हा मुलाच्या आवडी-निवडी जाणून पदार्थ बनवले, तर मूलही खूश होऊन जाते.

मुलाच्या आधी पालकांनी अलर्ट राहणं आवश्यक आहे. मुुलाची जबाबदारी ही आपलं प्रथम कर्तव्य मानून वागलं, तर मूलही सतर्क होतं. आपण काही सूचना मुलांनाही देऊन बाहेरच्या परिस्थितीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. अनेकदा पालक दिसले नाहीत, तर मुले भांबावतात आणि मग पालकांची वाट न पाहता मिळेल तो रस्ता पकडतात, यासाठी पालकांनी सतर्क राहणं जास्त आवश्यक ठरतं. आपलं मूल ज्या शाळेत जातं त्यांना दोष देत बसण्यापेक्षा अापली जबाबदारी आपण ओळखून एक पाऊल पुढे राहणं आवश्यक आहे.

अभ्यासातही मुलाला पालकांचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मूल शाळेत शिकतं, नंतर घरी आल्यावर होम वर्क करतं. नंतर ट्यूशनला जातं. पण आपल्याला त्याचा पत्ताच नाही. मूल करतं अभ्यास हे गृहीत धरून चालणं म्हणजे अवघड परिस्थिती. मुलाचा अभ्यास नीट होतो आहे का? आपणही त्यावर जरा नजर टाकली पाहिजे. किमान एक तास तरी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलासाठी आपल्या नोकरीतून, घरच्या कामातून मुलाच्या अभ्यासासाठी राखून ठेवला पाहिजे. मुलाशी हितगुज साधलं पाहिजे.

मुलाच्या सुरक्षिततेचा विचार करताना मुलाचं भोवताल कसं आहे? मित्र कसे आहेत, याचा विचार केला पाहिजे. आईच्या मनाचा विचार करताना, शाळा सुरू झाल्या की, आईची जबाबदारी वाढतेच. दिवसभराच्या कामातून मुलाची ने-आण ते त्याचं खाणं-पिणं, त्याचा अभ्यास यावर लक्ष केंद्रित करताना तिच्या एकंदरीत व्यापलेल्या दिवसाचं टाइमटेबल ठरतं. आपली जबाबदारी जाणून वेळेचं गणित आखलं गेलं, तर सारं काही शक्य होतं. मुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आजच्या पालकांनी जागृत राहणं काळाची गरज बनली आहे.

priyanip4@gmail.com

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

2 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

3 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

3 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

3 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

4 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

4 hours ago