Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला आणि एकमेव कसोटी सामना येत्या १ जुलैला नियोजित आहे. मात्र त्या आधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्याच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या संदर्भात बीसीसीआयने ट्वीट करत याची माहिती दिली. सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

बीसीसीआयने ट्वीट करत म्हटले आहे की, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रोहित टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. रोहितची आरटी-पीसीआर टेस्टही केली जाईल.

https://twitter.com/BCCI/status/1540810550820716544

रोहितचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर भारतीय संघासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, कारण रोहित १ जुलैपासून होणाऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. त्याला कोरोनातून बरे होण्यासाठी किमान एक आठवडा लागेल. असे झाल्यास रोहित पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला कर्णधार बनवले जाऊ शकते.

Comments
Add Comment