Sunday, July 14, 2024
Homeदेशदेशातील पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला

देशातील पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला

सपाच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशामध्ये मोदी लाटच अजूनही कायम असल्याचे निकालावरून पुन्हा एकवार स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे, आझमगडमध्येही विजय मिळवला आहे. लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपचाच बोलबाला पुन्हा पहावयास मिळाला आहे. रामपूरमध्ये भाजपच्या घनश्याम लोधी यांनी सपा उमेदवार असीम राजा यांच्यावर ४२ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.

विधानसभेच्या सातही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या जागांसाठी २३ जून रोजी मतदान झाले होते. यामध्ये आपने दिल्लीतील राजेंद्र नगर जागा जिंकली आहे. त्याचवेळी त्रिपुरामध्ये भाजपने ४ पैकी ३ जागा जिंकल्या आहेत व काँग्रेसने १ जागा जिंकली आहे. वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशातील आत्मकूर जागा जिंकली आहे. झारखंडमधील मंदार मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे.

पंजाबमधील संगरूर येथे शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे सिमरनजीत सिंग मान ५ हजार ८२२ मतांनी विजयी झाले. आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग दुसऱ्या, तर काँग्रेसचे दलवीर गोल्डी तिसऱ्या स्थानावर राहिले. येथे अकाली दल आणि भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. आझम खान यांच्या राजीनाम्यामुळे आझमगड आणि अखिलेश यांच्या राजीनाम्याने रामपूरची जागा रिक्त झाली होती. दोन्ही जागा यापूर्वी सपाच्या ताब्यात होत्या.

भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या संगरूर लोकसभा जागेवर आपने गुरमेल सिंग, काँग्रेस दलवीर सिंग गोल्डी आणि भाजपने केवल धिल्लन यांना उमेदवारी दिली होती. सिमरनजीत सिंग मान यांना अकाली दलाने (अमृतसर) उमेदवारी दिली होती.

दिल्लीतील राजेंद्र नगर मतदारसंघात आपचे दुर्गेश पाठक ११ हजार ४६८ मतांनी विजयी झाले आहेत. त्रिपुरामध्ये, आगरतळा, बोर्डोवाली टाऊन आणि सूरमा येथील भाजप आमदारांनी राजीनामा दिला होता.

जुबराजागरमधील सीपीआय (एम) आमदाराचे निधन झाले. बोरदोवली टाऊनमधून सीएम माणिक साहा यांनी काँग्रेसच्या आशीष कुमार साहा यांच्याविरोधात विजय मिळवला. माणिक ६ हजार १०४ मतांनी विजयी झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -