Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘भूल भुलैया २’ पार करणार २०० कोटींचा टप्पा

‘भूल भुलैया २’ पार करणार २०० कोटींचा टप्पा

दीपक परब

भूल भुलैया २’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात तो धुमाकूळ घालत आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात तो धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १८३.२४ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार, असे म्हटले जात आहे. आतापर्यंत या सिनेमाने १८३.२४ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा २०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. रविवारी या सिनेमाने २.५१ कोटींची कमाई केली आहे, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाका करत आहे. ‘भूल भुलैया २’ मध्ये कार्तिक आर्यनने ‘रूह बाबा’ ही भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. ‘भूल भुलैया’च्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या बालन, शाइनी आहुजा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती, तर ‘भूल भूलैया-२’ मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी, राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

‘कूल’ सोनालीच्या घायाळ अदा!

आपली मराठमोळी, कूल दिसणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ‘दिल चाहता है’, ‘सिंघम’ चित्रपटांतून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सोनालीने नुकतेच काही सुंदर ब्लॅक अँड व्हाइट व खास फोटो शेअर केले आहेत. काळ्या रंगाची साडीत परिधान केली आहे, ज्यात तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. सोनाली लवकरच हृषिकेश गुप्ते याच्या ‘दिल दिमाग और बत्ती’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले आदींच्या भूमिका आहेत.

बोल्ड सोनाली बेंद्रे

कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी दोन हात करून पुन्हा कार्यरत झालेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. सोनाली अनेकदा इन्स्टाग्रामवर नवा लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. याच कारणामुळे तिच्या फॉलोअर्सची यादीही वाढत चालली आहे. आता पुन्हा सोनालीच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. नव्या फोटोशूटमध्ये सोनालीने पांढऱ्या रंगाची धोती स्टाइल पॅन्ट आणि ब्रालेट घातलेली दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग श्रग कॅरी केला आहे. सोनालीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. त्याच वेळी, तिने तिच्या गळ्यात एक हेवी ब्लू स्टोन नेकपीस आणि कानातले घातले आहेत. सोनालीची नुकतीच डेब्यू वेब सिरीज ‘द ब्रोकन न्यूज’ रिलीज झाली आहे. या मालिकेत ती न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -