
मुंबई : मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीला शिंदेगटात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. शिंदेगटातील आमदारांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे संजय राऊत बंडखोर आमदारांबद्दल विधान करुन त्यांचावर घणाघाती टीका करत आहेत.
संजय राऊत यांच्याबद्दल प्रत्यक्षपणे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, दिपक केसरकर, अब्दुल सत्तार यांनी थेट नाव घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले. तरीही, संजय राऊत बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका करत आहेत.
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1540991124474830848
त्यावरुन, भाजप नेते आणि गुवाहटीतील हॉटेलमध्ये असलेले मोहित कंबोज यांनी ट्विट करुन संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत तोंड उघडताच शिवसेनेचा एक आमदार कमी होतो, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे.