Tuesday, August 5, 2025

अपात्रतेची नोटीस, गटनेते पद निवडी विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात

अपात्रतेची नोटीस, गटनेते पद निवडी विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. याचबरोबर विधानसभेत शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून त्यांच्याजागी अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. या दोन विषयांना शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उद्या, सोमवारी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या सुनावणी होणार आहे.


शिंदे गटाचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या विनंतीवरून विधानसभेच्या उपसभापतींनी शिंदे यांची या पदावरून हकालपट्टी केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उपसभापतींनी किमान सात दिवसांची नोटीस द्यायला हवी होती. विधानसभेत शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही आमदाराला शिवसेना गटनेते पदी नियुक्ती किंवा प्रतोद नियुक्ती करणे अयोग्य आहे.

शिंदे गटाने या याचिकेची प्रतही मविआ सरकारला देखील पाठविल्याची माहिती आहे. यामुळे न्यायालयाकडून जारी होणाऱ्या नोटीसीचा वेळ वाचू शकेल.
Comments
Add Comment