Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

नक्षत्र कंपनी घोटाळ्याचे दप्तर माझ्याकडे : महाडिक

सेालापूर : भीमा व लोकशक्ती परिवारातर्फे भीमा कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांच्या राज्यसभेतील ऐतिहासिक विजयाबद्दल टाकळी सिकंदर येथे नागरी सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.

मला, माझ्या कुटुंबाला, भीमा कारखान्याला सत्तेचा गैरफायदा घेऊन तालुक्याच्या नेत्यांनी त्रास दिला. साखर चोरीचा खोटा गुन्हा, आरसीसीची कारवाई करण्यासाठी सहकारमंत्री, साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या.

इतके दिवस त्रास सहन केला, येणाऱ्या काळात “करारा जवाब मिलेगा’ असे म्हणत भीमा कारखान्याच्या निवडणुकीत एक जरी अर्ज विरोधात भरला गेला तर तुमचा सहकारी कारखाना कसा खासगी झाला, कशा सह्या घेतल्या, सोसायटीतून शेतकऱ्यांच्या नरड्याला नख लावून कसे पैसे घेतले, नक्षत्र कंपनीत कोट्यवधींचा घोटाळा कसा केला? याचे दप्तर माझ्याकडे आहे.

मी फक्त एक अर्ज द्यायला अवकाश आहे. तुमचे सगळे उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी माजी आ. राजन पाटील यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >