
नवी दिल्ली : दुसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने २० षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला.
तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा पाच विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारतीय संघान टी-२० मालिकेवर २-० ने कब्जा केला आहे. या मालिकेतील तिसरा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाईल.
श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचे सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या डावातील पाचव्या षटकात शेफाली वर्मा बाद झाली. त्यानंतर एस मेघनाही स्वस्तात माघारी परतली.
या सामन्यात स्मृती मानधान मोठी धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा केली जात असताना तिच्या वयैक्तिक १७ धावांवर आऊट झाला. अखेर कर्णधार हरमनप्रीत सिंह (३१ धावा) संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने पाच विकेट्स राखून सामना जिंकला. श्रीलंकेकडून इनोका रणवीरा आणि ओ रणसिंगेनं यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तर, एस कुमारीला एक विकेट मिळाली.