Saturday, July 13, 2024
Homeदेशगुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चिट

गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चिट

जाफरींची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चिट देण्यात आले आहे. काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीच्या अहवालावर शिक्कामोर्तब केले आणि त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत योग्यता नसल्याचे म्हटले आहे.

२००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी एसआयटीने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर अनेकांना क्लीन चिट दिली होती, त्याविरोधात झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयाने आपला निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.

२८ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील गुलमर्ग सोसायटीमध्ये गुजरात दंगलीत एहसान जाफरीसह ६९ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एसआयटीने ६४ जणांना क्लीन चिट दिली होती, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव आहे. एसआयटीच्या या क्लीन चिटला झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राज्यात दंगली उसळल्या त्या वेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

दरम्यान, झाकिया जाफरी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, सीटी रविकुमार यांचाही समावेश आहे. या लोकांनी नरेंद्र मोदींच्या सहभागाबाबत युक्तिवाद केला नाही. तर, दुसरीकडे एसआयटीने झाकिया जाफरी यांच्या याचिकेला विरोध केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -