Thursday, July 3, 2025

बंडखोरांना विधान भवनात यावेच लागेल : शरद पवार

बंडखोरांना विधान भवनात यावेच लागेल : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांच्यामागे भाजप असून त्याची माहिती अजित पवारांपेक्षा आपल्याला जास्त असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.


एकनाथ शिंदे यांच्या मागे असणारा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपच आहे. दरम्यान बंडखोरांना विधान भवनात यावेच लागेल, असे पवार यानी सांगितले.


महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य विधानसभेत ठरेल. बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतरबंदी कायद्याखाली दोषी ठरेल. त्यामुळे मुंबईत आल्यावर हे सर्व आमदार शिवसेनेतच राहतील आणि सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा