
नारायण राणेंचा शरद पवारांना इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहेत, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिला आहे.
https://twitter.com/MeNarayanRane/status/1539999506330451969
बहुमत आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी विधानसभा हा मार्ग आहे, त्यामुळे बंडखोरांना परत यावेच लागेल, असे शरद पवार म्हणाले होते.
पवारांच्या या वक्तव्यानंतर नारायण राणे यांनी हे ट्वीट केले आहे. त्यामध्ये राणे यांनी, ‘माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल.’ असे राणे यांनी ट्वीटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/MeNarayanRane/status/1540001737326866432