Tuesday, November 5, 2024
Homeताज्या घडामोडीपोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश

पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष आमदारांनीही त्यांच्यातील खदखद या निमित्ताने बाहेर काढली. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक चांगलाच आक्रमक झाला आहे.

बंडखोरीमुळे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसह सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र पोलिसांकडून राज्यभरातील विशेषत: मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांसह मुंबईतील पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता राखावी, यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. या निमित्ताने पोलिसांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -