Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीशिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई

शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई

जालना : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करत जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची जमीन जप्त करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील सावरगाव हडत येथील जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, कारखान्याची इमारत, प्लांट आणि कारखान्याची यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी ईडीने जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश दिले होते. या कारखान्याचा वापर विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. रामनगर साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणात अर्जुन खोतकर यांची ईडी चौकशी करत आहे. आज ईडीने कारखान्याची जमीन जप्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -