मुंबई (हिं.स.) : राज्यात आज ४२०५ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर तीन कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. आज रोजी एकूण २५३१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज ३७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,८१,२३२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८२% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१७,९३,८७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,५४,४४५ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचा आणखी एक रुग्ण
• भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, (नीरी) नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर येथे बीए.५ व्हेरीयंटचा १ रुग्ण आढळला आहे.
• ही २७ वर्षांची महिला असून तिचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे. १९ जून रोजी कोविड बाधित आलेल्या या रुग्णाला सुरुवातीला सौम्य लक्षणे होती. सध्या ती घरगुती विलगिकरणात असून पूर्णपणे लक्षणे विरहित असून तिची प्रकृती स्थिर आहे.
• यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २६ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत ५, नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ आढळले आहेत.